Skip to content

HENX INDIA

करोना काळात लोकांना मोफत जेवणाची सोय. ( 2020-21)

करोना काळात जेंव्हा लॉकडाऊन मुळे लोकांचा रोजगार थांबला होता, उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते, त्यामुळे रोजच्या उदरभरणाची भ्रांत होती, तेंव्हा *हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशन* ने लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. या उपक्रमात ISCKON आणि RSS यांचाही सहभाग होता. हा उपक्रम गरजू कुटुंबांसाठी कर्वे नगर, स्वारगेट, धायरी, खेड-शिवापूर, सिंहगड रोड, खडकवासला इत्यादी परिसरांमध्ये ६ महिने पेक्षा जास्त कालावधी साठी राबविण्यात आला.

करोना काळात अंध मुलींना धान्य आणि गरजेच्या वस्तू वाटप. ( 2020-21 )

करोना काळात लॉकडाऊन च्या दरम्यान हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशन ने २५ पेक्षा अधिक अंध मुलींना धान्य आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप केले.

नवरात्री उत्सव आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत खऱ्या दुर्गा "साफ सफाई कामगार महिला" यांना साडी चोळी देऊन सन्मान. (2021-22)

नवरात्रीमध्ये हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशन ने खऱ्या दुर्गांचा सन्मान करण्याचे ठरवले. पुणे महानगरपालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाला संलग्न अश्या २१ महिला सफाई कामगारांचा हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

संविधान दिनानिमित्ताने संविधानाचा जनजागृती कार्यक्रम (2022-23)

हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाशी संबंधित जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सिंहगड रोडवरील आनंद विहार परिसरामध्ये हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेण्यात आला.

आदिवासी कुटुंबांना किराणा वाटप (2022-23)

हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गोर्हे (बु), किरकटवाडी या गावांतील रहिवासी असलेल्या आदिवासी कुटुंबांना ३ महिने पुरेल इतक्या घरगुती किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गरजु मुलींना शालेय वस्तू वाटप. (2022-23)

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गरजु मुलींना शालेय वस्तू वाटप. (2022-23)

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबीर १९.०३.२०२३

हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९.०३.२०२३ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शरीराशी संबंधित विविध तपासण्या व डोळ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जांभुळवाडी येथे पुरस्कार समारंभ मोफत मार्शलआर्टस् प्रशिक्षण ०८.०३.२०२३.

हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जांभुळवाडी येथे पुरस्कार समारंभाचे आणि मोफत मार्शलआर्टस् प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महिला दिनानिमित्त रणरागिणी समाजभूषण पुरस्कार ११.०३.२०२३

हेनेक्स सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.अशा पुरस्कर्ती ज्यांनी तळागळपर्यँत जाऊन लोकांच्या समस्यांचे निराकरण केले. या समारंभादरम्यान रुपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते हेनेक्स सोशल फाउंडेशन मार्फत महिला सक्षमीकरणाच्या या नवीन उपक्रमाची सुरवात करण्यात आले.
हेनेक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन मार्फत पुण्यात प्रथमच बाबासाहेबांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून बाबासाहेबांच्या विचार आणि त्यांचे समाजाबद्दलचे योगदान याची माहिती या रथा द्वारे माहिती देण्याचा लहानसा प्रयोग